आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक परिसरात आज मंगळवार दि 7 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता भीषण अपघात झाला. कत्तलसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या कारचा हा अपघात असून, कारमध्ये तब्बल दहा जनावरे आढळली आहेत. या जनावरांचे पाय आणि तोंड बांधलेले होते.अपघातात काही जनावरे किरकोळ जखमी झाली असली तरी बहुतेक जनावरे सुखरूप बचावली आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, वाहन कुठून आले आणि कुठे जात होते याचा शोध घेतला जात आहे.