मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील आरोग्य केंद्र हे जवळपास २०२३ मध्ये बांधून पूर्ण झाले आज दोन वर्षाचा कालावधी उलटूनही या नवीन इमारतीत कुठल्याही प्रकारची रुग्णतपासणी होत नाही.दोन वर्षापासून लाखो रुपयांची बिल्डिंग बांधून पडून आहे सदर इमारतीची देखभाल ही होत नाही हा पूर्णपणे शासनाच्या पैशाचा अपव्यय होत असून इमारत दिसूनही रुग्णांना उपचार घेण्याकरिता इतरत्र जावे लागत आहे.