कंपनीत काम केल्याचे पैसे मागितले म्हणून ठेकेदाराने कामगाराचा मोबाईल काढून घेतला, एका हॉटेलात बंद करून सलग दोन दिवस मारहाण केली आणि सोडण्यासाठी तब्बल ५७ हजारांची खंडणीही मागितली.जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील या प्रकरणी किरण काटरनवरे (वय १८, रा. सांगवी खुर्द, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.