नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरातून मंडप व्यावसायिक निरंजन मराठे यांची बुलेट गाडी चोरीला गेली होती. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आज समोर आला आहे. बुलेट गाडी चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून समोर आली आहे. नंदुरबार शहर पोलीस पथक चोरांचा शोध घेत आहे.