वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना, शिस्त लागावी यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने धडक कारवाईची मोहीम राबवली जात असते, गतवर्षी वाहने रस्त्यावर पार्किंग करणे, धोकादायक रीत्या वाहने चालवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, विना हेल्मेट प्रवास करणे, अश्या वाहन चालकांवर मागील वर्षभरात सुमारे 60 हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती, यातील सुमारे 30 हजार 225 वाहन चालकांकडून 52 लाख 57 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.