शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास उल्हासनगर मनपा क्षेत्रातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक शेखर यादव आणि माजी नगरसेविका संगीता सपकाळे यांनी शुभ दीप निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह उबाठा गटाचे उपविभागप्रमुख विनायक खानविलकर, उपशाखाप्रमुख मिलिंद गावडे, मंगेश पालांडे, संजय भोईर, अनंता अमृते, सुनील जानवलेकर, राज पटेल, साबीर शेख, नितीन सपकाळे, शुभम सपकाळे, आयुष सपकाळे प्रवेश केला.