ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत लगतच्या ग्राम फुलचूरटोला येथील साई माऊली कॉलनीतील रहिवासी अनिल आत्माराम शेंडे यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविले ही घटना दिनांक ४ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली शेंडे आपल्या घराच्या पोर्चमध्ये जिन्याच्या रेलिंगला दोरीने गडफास घेऊन मृता अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती श्याम कावळे यांनी पोलिसांना दिली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासणीतही मृत्यू गळफासामुळे झाल्याचे निष्पन्न झाले