शहरातील मंठा चौफुली परिसरातील अंकुश सर क्लासेस येथे खाजगी शिकवणीसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यास क्लासेसमधील दोघांनी लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण केली. यात गंभीर ूजखमी झालेल्या विद्यार्थ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोघांविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 वाजता पोलीस सुत्रांनी दिली आहे. यश रमेश इंगळे (वय 18, रा. सोनलनगर, जालना) हा इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी खाजगी शिकवणीसाठी जातो.