शाहुपूरी पोलिसांनी दि. ४ ऑगस्ट रोजी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित विशाल अजित पाटोळे वय २६, रा. गोगावलेवाडी, ता. सातारा यास सीसीटीव्हीच्या आधारे शाहुपूरी पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील १ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.