भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. यामुळे हातनूर धरणाच्या पाणीपातळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशात दिनांक ३ सप्टेंबर रोजी हतनूर धरणाचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असल्याची माहिती हातनूर प्रकल्पातर्फे देण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.