भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास भाजप मुंबई कोअर कमिटीची बैठक दादर येथे संपन्न झाली. यावेळी आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम व कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार प्रसाद लाड, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाल शेट्टी, माजी खासदार मनोज कोटक, माजी आमदार सुनील राणे उपस्थित होते.