गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम एकोडी येथील मोटार दुरुस्ती वर्कशॉपबाहेर उभी असलेली टाटा सुमो चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) समोर आली.मोसीम अमीरहनजा शेख (३२, रा. एकोडी) यांचे एकोडी येथे एचकेजीएन नावाचे मोटार दुरुस्तीचे वर्कशॉप आहे. त्यांनी आपली टाटा सुमो क्रमांक एमएच ३५ पी ००३४ ही गाडी वर्कशॉपजवळ उभी केली होती. मात्र, २० ते २२ ऑगस्टदरम्यान रात्री अज्ञात चोरट्याने ती गाडी चोरी करून नेली. चोरीला गेलेल्या गाडीची किंमत १ लाख ५० ह