सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अजितदादा पवार यांच्यावर विरोधकांकडून टीकेची मालिका सुरू आहे. मात्र या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मिरजेत स्वाभिमानी आंबेडकरी समाजाकडून अनोखा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी “अजितदादा पवार यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपण