सांगोला तालुक्यातील एका गावात किराणा साहित्य आणण्यासाठी जाताना एकाने महिलेकडे पाहून दगड फेकला, दगड का फेकला म्हणून जाब विचाणाऱ्या महिलेचा घराशेजारी राहणाऱ्या भावकीतील तरुणाने हात धरून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. ही घटना बुधवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली. याबाबत पीडित महिलेने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय कसबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.