स्वस्त नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आरोग्य शिबीर शुक्रवार दि. 29 सप्टेंबरला दिवसभर संपन्न झाले. आरोग्य विभाग नागपूर यांच्या निर्देशानुसार देशाच्या आरोग्य दृष्टिकोनातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संपूर्ण देशभर महिलांच्या आरोग्य तपासणी, उपचार सेवा व पोषण आहार यावर विशेष भर देण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून या आरोग्य शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय,रामटेक येथे करण्यात आले.