तालुक्यातील सोनी येथील एका 19 वर्षीय युवतीचा सोनी येथे लागून असलेल्या नवीन तलावात मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली. दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली.चित्रांशी सुरेंद्र बोपचे वय 19 वर्ष असे मृतक युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रांशी बोपचे ही दिनांक 29 ऑगस्ट च्या सकाळी 11:30 वाजेपासून घरून बेपत्ता होती. दुपारी चित्रांशी च्या कुटुंबाने तिचा तिकडे तिकडे शोध घेतला. मात्र थांगपत्ता लागला नाही.