*प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा* अंतर्गत *उपकेंद्र अमोदा* येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठांच्या आदेशान्वये अवयव दान पंधरवाडा सप्ताह निमित्त *अमोदा येथील जि.प शाळेत* अवयव दानाची माहिती , व अवयवदान का करावे व कसे करावे, व याचा कोणाला फायदा होतो व आपल्याला काय मिळते याची संपूर्ण माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अतुल वायकोळे यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितली यावेळी अवयव दानाची प्रतिज्ञा देखील घेण्यात आली व अवयव दानासाठी नोंद कोठे करावी कशी करावी याची संपूर्ण माहिती देऊन अवयव दान सप्ताह साजरा करण्यात आला.यावेळी सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा ताई उपस्थित होत्या.