श्रीगोंद्यात रात्री उशिरा पोलिसांची धडक कारवाई – तब्बल २ लाख ४२ हजारांचा गुटखा जप्त” रात्री आठच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली. ढवळगाव फाटा परिसरात असलेल्या पानटपरीवर झडती घालण्यात आली आणि या झडतीत तब्बल २ लाख ४२ हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.या कारवाईत पानटपरी चालवणारा अनिकेत रामदास सोनवणे, वय २७, रा. बेलवंडी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुन्हा नोंदवून पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत.