उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीत तिरु नदीवर २४ ऑगस्ट रोजी एका सुटकेस मध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता, याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार व उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भात लवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता, अखेर या खुनातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे.