हिंगोली येथे आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दोन वाजता दरम्यान जन सुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या आघाडीतील प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.