चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या एका आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपी गणेश भिकन गोसावी (वय २०) याला डोण, ता. चाळीसगाव येथून पकडण्यात आले असून त्याला पुढील कारवाईसाठी हिंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनेचा तपशील नागपूर शहरातील हिंगणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी गणेश गोसावी हा वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना ३० ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता.