हिंगणघाट :सामान्यत मोठे कार्यक्रम असोत किंवा प्रभातफेरी, रॅली,गर्दी संपली की रस्त्यावर अस्वच्छता हा कायमस्वरूपी भाग ठरतो.परंतु हिंगणघाट शहरातील ईद मिलादुन्नबीचा जल्लोष याला आजचा हा दिवस अपवाद ठरला. मुस्लिम बांधवांनी जश्ने ईद मिलादच्या भव्य रॅलीदरम्यान केवळ स्वच्छतेचा संदेश दिला नाही तर प्रत्यक्षात स्वच्छतेची अंमलबजावणी करून दाखवली. रॅली ज्या मार्गाने गेली त्या रस्त्यांवर लगेच स्वच्छता करण्यात आली. परिणामी कार्यक्रमानंतर शहरात कुठेही घाण, कचरा वा अस्वच्छतेचे दृश्य दिसले नाही.