आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी रविवारला दुपारी दोन वाजेच्या सुमारास छिपिया येथे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत गणेश आडकुजी बोहरे मुन्ना जी लांजेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवागत सदस्यांना भाजपची विचारधारा आणि सांस्कृतिक सिद्धांत या संदर्भात माहिती देण्यात आली. आमदार विनोद अग्रवाल यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार अग्रवाल यांनी दोघांचेही पक्षाचा दुपट्टा देत स्वागत केले.