कळगाव शिवारात शेतातुन जाण्या येण्यासाठी रस्ता दिला नाही म्हणून आखाड्यात झोपलेल्या शेतकऱ्याच्या पोटात चाकु मारुन जागीच ठार केले.तर या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून मयताच्या मुलाने शेतातील ऊसाने पळ काढल्याने बालाबाल वाचला आहे.ही घटना दिनांक 29 रोजी रात्री साडेसात वाजता घडली. या प्रकरणी शनिवार दिनांक 30 रोजी पहाटे तीनच्या सुमारास ताडकळस पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक केली आहे.