वन विभाग गोंदिया अंतर्गत वनपरिक्षेत्र सडक/अर्जुनी येथे १ ऑक्टोबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या वन्यजीव सप्ताहाचा (Wildlife Week) उत्साहात प्रारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी, मा.वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करून वने व वन्यजीव संरक्षणाबद्दल जनजागृती करण्यात आली. या रॅलीत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.