हिंगोली जिल्ह्यातील वरुड देवी येथे आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी पाच वाजता दरम्यान सार्वजनिक बैलपोळा साजरा करण्यात आला यावेळी सर्व देवांची विधीवत पूजा करत शेतकऱ्याचा लाडका सर्जा राजाला सजवून बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी बैलपोळ्याच्या वेळी मंगलाष्टके म्हणून संगीत ढोल ताशाच्या सुरात धार्मिक विधी संपन्न झाला आहे