चांगोटोला गावात यावर्षीही शेतकऱ्यांच्या परंपरेचा, लहान चिमुकल्यांचा तान्हापोळा उत्सव स्पर्धा भव्य स्वरूपात पार पडला. सलग दुसऱ्या वर्षीही हा उपक्रम सरपंच श्यामकुमार फाये यांच्या पुढाकारातून हनुमान मंदिरच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते. गाव व परिसरातील चिमुकलयांनी सजवलेल्या नंदीबैला सह स्वतः शेतकरी वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी होता. शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.