शहरात एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी कृष्णा राजेश बंगाले (वय २५) याला अचलपूर पोलिसांनी अटक केली आहे. १७ वर्षे वयाच्या पीडित मुलगी आजारी पडल्याने अचलपूर येथील कुटील रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे वैद्यकीय अधिकार्यांसमक्ष तिचे डीडी बयान नोंदविण्यात आले. त्यात तिने सांगितले की, तिच्या मोहल्ल्यात राहणान्या कृष्णा बंगालेने त्याच्या आजीच्या घरी कोणी नसताना लग्नाचे आमिष दाखवत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.