ग्रामीण, सातारा, रायगड जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, घातक हत्याराचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे, मारहाण करुन जबरी चोरी करणे, डॉक्टरांवर हल्ला करणे, आदी गंभीर गुन्हे करणाऱ्या वडगाव मावळ येथील कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.