सांगली येथे हळद उत्पादन करणारे शेतकरी व व्यापारी यांची भेट घेऊन हळद बद्दल माहिती घेतली. यावेळी सांगली येथे कार्यरत असलेल्या श्री.सारडा जी यांच्या अत्याधुनिक हळद प्रक्रिया उद्योगाची पाहणी करून तेथील यंत्रसामग्री, उत्पादनाची गुणवत्ता व मार्केटिंग पद्धती यांचा अभ्यास केला.या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बाजार समितीचे सभापती, संचालक, सचिव यांच्या सोबत चर्चा केली. तसेच चेंबर ऑफ कॉमर्स चे सर्व पदाधिकारी यांच्या सोबत ही चर्चा केली.