पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य शिबिर व आरोग्य सेवा उपलब्ध करून जनजागृती उपक्रम राबवणे संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक संपन्न झाली. उत्सव काळात मोफत आरोग्य शिबिरे, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच आरोग्य विषयक जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.