मौजा भूताईटोला सासंद आदर्श ग्राम पाथरी येथील हनुमान चौकात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेल राज्यसभा खासदार भारत सरकार यांच्या स्थानिक निधीतून नविन बोरवेल मंजूर करण्यात आले. आज दिनांक 12,9,2025 ला सकाळी 9 वाजता नवीन बोरवेल कामाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष केवलभाऊ बघेले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार प्रफुल्लभाई पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांचे आभार मानण्यात आले.