हिंगणा तालुक्यातील सातगांव (वेणानगर) येथील शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे पदाधिकारी दिनेश कोळसे तसेच भारकस (किरमीटी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मयुर पेंदाम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पक्षात त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रवेश सोहळ्यासोबतच आतिश उमरे, सौ. उज्वलाताई बोढारे, सचिन मेंढजोगे, विकास दाभेकर, महेश लोखंडे, अरुण वानखेडे, सागर मोहितकर आदी उपस्थित होते.