राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता माजी मंत्री दादा जाधवराव यांची जाधववाडी येथील निवासस्थानी भेट घेतलीय...जाधवराव आणि शरद पवार हे राजकारणातील जुने सहकारी आहेत.मात्र 30 वर्ष आमदार राहिलेल्या दादा जाधवराव यांना शरद पवारांच्या एका वक्तव्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा पासून वीस वर्ष या दोघांची भेट झाली नव्हती....लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार अनेक जुन्या पण दुरावलेल्या किंवा दुखावलेल्या सहकाऱ्यांच्या गाठी भेटी घेत आहेत.