नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांनी बोळिंज परिसरात भेट देत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बोळींज येथील साई दर्शन इमारतीला ओसी मिळालेली आहे त्यामुळे या ठिकाणी पाणीपुरवठा उपलब्ध नाही त्याचप्रमाणे मूलभूत कामे अपूर्ण आहेत. या संदर्भात आमदारांनी रहिवाशांची चर्चा करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते.