पीडित विजय मोहन सिंग बिसेन वय 35 वर्ष हे नेहमीप्रमाणे मंगळवार ला वाडी पोलीस स्टेशन समोरून जात असताना पांढऱ्या रंगाच्या झायलो कार मधून आरोपींनी त्यांचे अपहरण केले आणि त्यांना जबर मारहाण केली. आरोपीमध्ये रितेश ढवळे, चेतन मांडवकर व श्वेता मांडवकर यांचा समावेश आहे. रितेश ला संशय होता की विजय चे त्याच्या बहिणीशी प्रेम संबंध आहे. याच कारणावरून विजय अपहरण करून त्याला जब्बर मारहाण करण्यात आली या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.