नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नवापूर शहरासह तालुक्यात गावात पाणीच पाणी झाले आहे. विसरवाडी गावात मुसळधार पावसामुळे एका बेकरीत चार ते पाच फुटापर्यंत पाणी शिरल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. त्यासोबतच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी वस्तूंची नासाडी झाली आहे.