नागपूर शहरात आज भक्ती आणि श्रद्धेचं वातावरण दाटून आलं आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज विसर्जनाची वेळ आली असून, शहरातील विविध मंडळांच्या गणेशमूर्ती जल्लोषात, भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. ‘नागपूरचा राजा’ म्हणून ओळखली जाणारी महाल गणपतीची मूर्ती आज विसर्जनासाठी रवाना झाली. महाल परिसरातून निघालेली ही विसर्जन यात्रा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे.