उदगीर शहरातील जय जवान चौकात रहदरीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात ३ ऑक्टोबर रोजी ऑटो चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जय जवान चौकात ३ ऑक्टोबर रोजी साडे दहा वाजता ऑटो चालकाने सार्वजनिक रोडवर ऑटो उभा करून रहदरीस अडथळा निर्माण करीत असताना पोलिसांना मिळून आला याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल अंगद नाडागुडे यांच्या फिर्यादी वरून ऑटो चालक बालाजी प्रकाश शेल्हाळे यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.