जिल्हातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळणारी गंभीर घटना समोर आली आहे. सकाळच्या सुमारास थंडी आणि तापाच्या आजारामुळे भाग्यश्री हेमराज काशीकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील सफाई कामगाराने वैद्यकीय प्रशिक्षण नसतानाही त्यांना सलाईन लावण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या रुग्णाची वापरलेली दूषित सिरीन त्यांना लावण्यात आली. या गैरप्रकारामुळे रुग्णाच्या जीवनाला धोका निर्माण झाला असून, हिपॅटायटिस किंवा इतर संसर्गजन्य आजाराची भीती व्यक्त केली.