गेल्या आठ महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात वास्तव्यास असलेला पट्टेरी वाघ आज (गुरुवारी) रोजी धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारात शेतकऱ्यांना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी वाघाला पाहिल्यानंतर तातडीने इतरांना माहिती दिली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.