बारासवाडा येथील तळ्यात १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू; घातपाताचा संशय शहापूर (ता. अंबड) | १० सप्टेंबर: बारासवाडा येथील तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल, ९ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. कृष्णा ज्ञानेश्वर बाबर (वय १७, रा. शहापूर, ता. अंबड) असे मृत युवकाचे नाव आहे. तो मित्रां सोबत पोहण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत तळ्यात पोहण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर