सगळ्या समाजाच्या नरडीचा ईव्हीएमने घोट घेतला आहे, अशी प्रतिक्रिया माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी दिली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माळशिरस तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी विविध आंदोलने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.