श्री. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने "श्री गणेश आरोग्य अभियान" अंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी ही शिबिरे भरविण्यात येणार आहेत.