वर्धा जिल्ह्यात असाही एक कलाकार पर्यावरण पूरक बनवतो मॉ दुर्गा देवीचीरंगीबेरंगी मूर्तीचा उत्साह, रोषणाईचे झगमगते दिवे, ढोल-ताशांचा नाद पण या चकाकीच्या पलीकडे शांत, मातीचा सुगंध दरवळणारा एक कोपरा आहे. हिंगणघाट तालुयातील अल्लीपूर येथे तरुण अभियंता परेश सावरकर दरवर्षी देवीला नवी ओळख देतो. ही ओळख आहे पुनर्जन्माची. कारण तो बनवतो ती मातीची दुर्गामूर्ती केवळ कलाकृती नसते तर पंधरा वर्षांपासून एकाच मातीतून घडलेली श्रद्धा