बीड-नगर रेल्वे सेवा १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सुरू होणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आज गुरुवार दि 11 सप्टेंबर रोजी, दुपारी 1 च्या दरम्यान बीड रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. कार्यक्रमासाठी बैठक व्यवस्था, पार्किंग व सुरक्षा याबाबत नियोजन