बुलढाणा शहरातील पत्रकार भवन येथे 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता वृत्तेश्वर गणेश मंडळात आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती पार पडली. या पवित्र प्रसंगी महाराष्ट्र शासनाचा कला क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार मिळालेल्या प्रख्यात कवी-गझलकार-गीतकार वैभव देशमुख तसेच गझलकार विशाल मोहिते यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला सुरेश वैराळकर, सुधाभाऊ आहेर, डॉ. शोन चिंचोले आदी उपस्थित होते.