चिखली तालुक्यातील हरणी हे शांतताप्रिय गाव एका प्रौढ इसमाच्या निर्घृण हत्येने हादरले. या इसमाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.काल बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा खळबळजनक घटनाक्रम घडला. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. गजानन बारकू पवार (वय ५५वर्षे, राहणार हरणी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवराम कुसळकर (राहणार हरणी तालुका चिखली ) असे आरोपीचे नाव आहे.