मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. सदावर्ते यांनी जरांगे यांना आंदोलनाची परवानगी नाकारावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा अर्ज दाखल केला होता.