आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नांमुळे एटापल्ली तालुक्यातील अत्यंत खराब झालेला सुरजगड ते गट्टा (रस्ता क्र. 381) या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दयनीय अवस्थेत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.